आपला ई पेपर परळी वैप्रतिनिधी
शहरातील गुरुकृपा नगर भागातील रहिवासी तथा व्यापारी राजाभाऊ गुंडाळे यांचा मुलगा नवनाथ राजाभाऊ गुंडाळे सी.ए. परिक्षेत उत्तीर्ण झाला असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील स्टेशन रोडचे कापडाचे व्यापारी राजाभाऊ गोविंद गुंडाळे यांचा मुलगा नवनाथ गुंडाळे नुकताच लागलेल्या सी.ए. परिक्षेत २१० गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. नवनाथने अवघड समजली जाणारी सी.ए.च्या परिक्षेत अत्यंत मेहनत, कष्टाने यश संपादन केले आहे. नवनाथच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच भावसार समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.


Social Plugin