Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत औष्णिक विद्युत केंद्रात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर पदोन्नती?चौकशीची मागणी! संदिप मस्के

बोगस प्रमाणपत्रांची मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

420

आपला ई पेपर परळी वै प्रतिनिधी

 परळी औष्णिक विद्युत केंद्रात,संभाजी निवृत्तीराव बुकतारे,कार्यकारी अभियंता,औष्णिक विद्युत केंद्र परळी वै.यांनी वैद्यकीय अधिकारी यांचेशी संगनमताने खोटे व बनावट अपंगत्वाचे (दिव्यांग) प्रमाणपत्र हस्तगत करुन ते खरे असल्याचे भासवून, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) कडे दाखल करुन 

अधिक्षक अभियंता या उच्च श्रेणीत पदोन्नती घेऊन शासनाची फसवणूक करुन विश्वास घात करणाऱ्या संभाजी  बुकतारे यांचे बोगस अपंगत्वाचे (दिव्यांग)प्रमाणपत्रची उच्चस्तरीय वैद्यकीय विभागा कडून चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी परळी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप मस्के यांनी लेखी तक्रार महानिर्मिती व जिल्हाधिकारी बीड यांचे कडे केली आहे.      

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, परळी औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ येथे वेगवेगळ्या प्रकारचे बोगस व बनावट प्रमाणपत्र खरे असल्याचे भासवून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेशी संगनमताने शासनाची फसवणूक करुन नौकऱ्या, पदोन्नती मिळवल्या आहेत.त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही.


असेच संभाजी निवृत्तीराव बुकतारे यांना औष्णिक विद्युत केंद्रात नौकरी लागली तेव्हा ते अपंग(दिव्यांग) नव्हते व आजही नाहीत.महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, परळी औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ येथे कार्यरत असलेल्या संभाजी निवृत्तीराव बुकतारे,कार्यकारी अभियंता,यांनी उच्च श्रेणीत पदोन्नती मिळवण्यासाठी महानिर्मिती कडुन पदोन्नती कोणत्या वर्गवारीत आहे व ती कशी मिळविता येईल याची चौकशी केली.

अनुसूचित जाती,अंपग(दिव्यांग) प्रवर्गातून एक जागा आहे, तेव्हा शारिरीक दृष्ट्या सक्षम असलेल्या संभाजी निवृत्तीराव बुकतारे, कार्यकारी अभियंता,यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक,ऑर्थोपेडिक विभाग बीड मधील वैद्यकीय अधिकारी यांचेशी

 संगनमताने शासनाची फसवणूक करुन संभाजी निवृत्तीराव बुकतारे यांना 52% श्रवन अक्षमता,अपंग (दिव्यांग)असल्याचे Disability Certificate( Multiple Disability) Certificate No.1239 Date 10/07/2013, अन्वये हस्तगत करुन ते खरे असल्याचे भासवून संभाजी निवृत्तीराव बुकतारे,कार्यकारी अभियंता,यांनी उच्च श्रेणीत पदोन्नती 

मिळवण्यासाठी,महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित,परळी औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ (महानिर्मिती) यांचेकडे दाखल केले सदरचे खोटो व बनावट अपंगत्वाचे (दिव्यांग) Disability Certificate कोणतीही खात्री व पडताळणी न करता, मुख्य अभियंता (तांत्रिक),महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित,(महानिर्मिती) यांचे,

कार्यालयीन आदेश,मु.अ.(तांत्रिक)/ कार्य.अभि.ते अधि./ अभि./पदोन्नती/7950 दिनांक:29/08/2022 प्रमाणे अ.क्र.11,संभाजी निवृत्तीराव बुकतारे, अनुसूचित जाती (दिव्यांग), कार्यकारी अभियंता परळी औ.वि.कें.,या पदावरून परळी औ.वि.कें येथे अधिक्षक अभियंता या उच्च श्रेणीत पदोन्नती देण्यात आली आहे.

संभाजी निवृत्तीराव बुकतारे,कार्यकारी अभियंता,परळी औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ यांनी खोटे व बनावट अपंगत्वाचे (दिव्यांग)प्रमाणपत्र हस्तगत करुन उच्च श्रेणीत पदोन्नती, वैद्यकीय अधिकारी व महानिर्मिती चे अधिकारी व कर्मचारी यांचेशी संगनमताने मिळवली असून त्यांचे अपंगत्वाचे (दिव्यांग) प्रमाणपत्रची उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, छत्रपती संभाजी नगर, नागपूर,पुणे येथील वैद्यकीय अधिकारी यांची उच्च स्तरीय विभाग (Medical Board)स्थापन करुन वैद्यकीय अहवाल मागवून/ चौकशी करून संभाजी निवृत्तीराव बुकतारे, कार्यकारी अभियंता,औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ, 

यांचे अपंगत्वाचे (दिव्यांग) Disability Certificate रद्द करण्यात येऊन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी म्हणून परळी येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप बबन मस्के यांनी लेखी तक्रार महानिर्मिती व जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे दाखल केली आहे.अशी माहिती संदीप मस्के यांनी दिली आहे.



अज्ञात निर्दयी मातेला एका आठ महिन्याच्या मुलीस फेकण्याची वेळ का ? आली, तो गुन्हेगार कोण ?



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या