Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सीबीएसई ग्रीन ओलंपियाड स्पर्धेत सिंदफणा शाळेचे अकरा विद्यार्थी झळकले

आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली तसेच दिल्ली स्थित द एनर्जी अँड रिसोर्सेस संस्था (टेरी)  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रीन ओलंपियाड स्पर्धेत येथील विद्याभवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या पब्लिक स्कूलचे अकरा विद्यार्थी झळकले. या यशाबद्दल सर्व स्तरातून सिंदफणा शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सविस्तर वृत्त असे की,  दरवर्षी पर्यावरण या विषयावर इयत्ता चौथी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर मध्ये ग्रीन ओलंपियाड या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.  यावर्षी शाळेतील ४२ विद्यार्थ्यांनी यामधे सहभाग नोंदविला होता. यातील ८ विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र तर ३ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये इयत्ता आठवीतून धनराज बजाज व भार्गवी गुंजकर, इयत्ता नववीतील शेख शानिफ, आयुष वाघमोडे, हर्षवर्धन काळे, सचिन पवार व नैतिक संचेती तर दहावीतील वरद  इंदाणी हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. तर नववीतील शौर्य मुगदिया, राजनंदिनी बजाज व प्रथमेश परदेशी या विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उप्र प्राचार्य राहुल कदम, शैक्षणिक विभाग प्रमुख जीबी ऑगस्टीन, सुजा चाको, धनंजय सोमवंशी, अर्चना जाधव, स्पर्धेचे शाळेतील समन्वयक विजय फासाटे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या