Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अज्ञात निर्दयी मातेला एका आठ महिन्याच्या मुलीस फेकण्याची वेळ का ? आली, तो गुन्हेगार कोण ?

Apla epaper


आपला ई पेपर दिलीप बद्दर परळी 

परळी तालुक्यातील मालेवाडी रोडवर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर अज्ञात निर्दयी मातेने एका आठ महिन्याच्या मुलीस पोत्यात गुंडाळून फेकल्याची खळबळजनक घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी घटनास्थळ गाठुन मुलीस ताब्यात घेत परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सदर मुलीवर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दि. ८ जानेवारी २०२४ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना अज्ञात इसमाने फोन करून माहिती दिली की, मालेवाडी रोड लगत एक मुलगी पोत्यात गुंडाळून फेकलेली आहे कुणी फेकली माहित नाही. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, व पोलीस जमादार सुनील अन्नमवार यांच्यासह घटनास्थळ गाठले आणि पाहतात तर काय एक आठ वर्षीय मुलगी तिचं अर्ध शरीर पोत्यात आणि पाय बाहेर अशा स्थितीत आढळून आली. पोनी हेमंत कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर मुलीस परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून उपचारार्थ दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ तुकाराम गुट्टे, ब्रदर मगन वसावे, संजय वरवटकर, सिस्टर गायकवाड आणि मुलीवर ताबडतोब उपचार सुरू केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या