Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी येथील प्रसिद्ध दातांचे डॉ. देविदास मुंडे यांचे निधन

 

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


नाथरा गावचे ,परळी येथील प्रसिद्ध दातांचे डॉक्टर डॉ. देविदास मुंडे यांना आज पहाटे दीड च्या सुमारास देवाज्ञा झाली. सामाजिक कार्या सोबत परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयाचे उपाध्यक्षपदी ते गेल्या काही वर्षांपासून कार्यभार सांभाळत होते.

 त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे डॉक्टर पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, आज दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या नंतर परिवारात तीन मुली दोन मुले नातवंड असा मोठा परिवार आहे.

डॉक्टर संतोष मुंडे यांचे ते चुलते होते

आज दुपारी 3.00 वाजता त्यांच्या पार्थिवावर परळी येथे अंतिम संस्कार होतील.

ईश्वर त्यांच्या कुटुंबास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या