Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणा शाळेने मुला - मुलींना सदैव समान संधी दिल्या : संजना दुग्गड



माजी विद्यार्थांच्या हस्ते ध्वजारोहणाची परंपरा कायम

आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी

सर्वांगीण शिक्षणासोबतच सिंदफणा शाळेने मुला - मुलींना नेहमी समान संधी उपलब्ध करून दिल्या ज्यामुळे आम्ही घडलो, असे प्रतिपादन सिंदफणा पब्लिक स्कूलच्या माजी विद्यार्थी तथा सध्या इंटेरियर डिझायनर म्हणून पुणे येथे कार्यरत असलेल्या संजना दुग्गड यांनी केले. 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करावे. आज बरेच क्षेत्र असे आहेत, ज्या मध्ये कुशल व्यक्तींची गरज असल्याचे मत व्यक्त केले. 

सविस्तर वृत्त असे की,सिंदफणा पब्लिक स्कूलने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण शाळेच्या माजी विद्यार्थांच्या हस्ते करत परंपरा कायम राखली. ध्वजारोहणानंतर घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपप्राचार्य राहुल कदम यांनी केले.

 त्यांनी जमलेल्या सर्व विद्यार्थी, पालक यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  यानंतर पूर्व प्राथमिक विभागातील तेजल देशमुख, अवनी शिंदे या विद्यार्थ्यांनी भाषण केले तर  प्राथमिक विभागातील गौरवी लोहिया व फैजा शेख या विद्यार्थ्यांनी आपले भाषण केले. 

 माध्यमिक विभागातील नैतिक लड्डा, सारंग पवार व झियान शेख या विद्यार्थ्यांनी भाषण केले. शाळेच्या गणित शिक्षिका गीतांजली कलम यांनी  प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आपल्या भाषणात अधोरेखित केले. 

सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नाटक आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्राचार्य अन्वर शेख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाची एक प्रत आपल्या घरी ठेवून ती धर्मग्रंथासारखी वाचावी असे आवाहन केले. 

प्रजासत्ताक दिनाच्या या शुभप्रसंगी पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगम तातेड व वेदिका आहे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या