Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दहावीची गुणवंत कु. मानसी पींप्रतीवार हिच्या हस्ते झेंडावंदनाच्या कार्यक्रम


आपला ई पेपर/ परळी / प्रतिनिधी 

राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे उद्या दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 8 : 30 वाजता विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. राजस्थानीज पोदार लर्न स्कूलची इयत्ता दहावीच्या वर्गात गुणवंत ठरलेली  कु. मानसी पींप्रतीवार हिच्या हस्ते

 झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .शहरातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी केले आहे. 



हेही बघा...सर्वात जास्त व्हायरल व्हिडिओ राम लला चे अप्रतिम चमत्कारिक रूप..*
💥💥👇💥💥
*https://youtu.be/obxwelB-g60?feature=shared*


यावेळी पोदार स्कूलचे अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग ,प्राचार्य मंगेश काशीद , उपप्राचार्य लक्ष्मण पाटील  यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमात सहभागी पथकात एन.सी.सी., एम.सी.सी. , स्काउट गाईड इत्यादी. विभागांचा समावेश असून पथकांच्या संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली जाणार आहे.मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रात्याक्षिके या मध्ये सादर केले जाणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या