Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचा विद्यार्थी कुराश क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात दुसरा



राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धात दीपक गीतेला मिळाले महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक  

आपला ई पेपर/ परळी / प्रतिनिधी
अहमदनगर येथील जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्कच्या मैदानावर राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धा  नुकत्याच संपन्न झाल्या.
राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धा. 2023-24 यामध्ये दीपक गोविंदराव गीते याने 14 वर्षे वयोगटात 50 किलो खालील वजन गटामध्ये  दुसरा क्रमांक (silver medal) मिळवल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धांत राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांने स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी करत राज्य स्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत पोदार लर्न शाळेतील या स्पर्धेत यश मिळवल्यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

14 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धात वयोगटातील 45 ते 50 किलो स्पर्धेत पोदार स्कूलचा विद्यार्थी दीपक गोविंद गीते याने व्दितीय क्रमांक मिळविला असून राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवले आहे. अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.

या सर्व गुणवंत खेळाडूंचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच परळी तालुकास्तरीय क्रीडा  ज्येष्ठ शिक्षक सुभाष नाणेकर गुरुजी, तालुका क्रीडा समन्वयक संजय उर्फ पापा देशमुख सर, पंच ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अजय जोशी,पंच अतुल दुबे, पंच ज्येष्ठ क्रीडाशिक्षक विलास आरगडे सर यांनीही भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

या यशस्वी खेळाडूच्या नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच मार्गदर्शक क्रिडाशिक्षक सूर्यकांत घोलप, सिताराम कराड यांचे ही राजस्थानी पोदार स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या