Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्व.श्यामरावजी देशमुख स्मृतिसमारोह अंतर्गत रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन


आपला ई पेपर परळी 


येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.संस्थेचे अध्यक्ष मा.संजयजी देशमुख , सचिव रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या  या कार्यक्रमात व्याख्यानाबरोबरच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

निबंध स्पर्धा यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेने व महाविद्यालयाने आपापल्या स्तरावर निबंध घेऊन त्यातील पहिल्या तीन मुलींचे निबंध दि.१० /०१/२०२४ पर्यंत संयोजन समितीकडे आणून द्यावेत.त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा ही दि.१० /०१/२०२४ रोजी सकाळी १०:३० वा. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रत्यक्ष संपन्न होईल.रांगोळी व निबंध स्पर्धेत प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम ,प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन स्मृतीसमारोहामध्ये दि. २४ जानेवारीला .सन्मानित करण्यात येणार आहे.रांगोळी स्पर्धेसाठी प्रा.डॉ.आर.आर. पाध्ये व प्रा. के. बी.देशपांडे मॅडम यांच्याशी तर निबंध स्पर्धेसाठी प्रा.डॉ.श्याम नेरकर यांच्याशी संपर्क साधावा व बहुतांश स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या , डॉ. विद्या देशपांडे यांच्यासह सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड व संयोजन समितीतील प्रा.डॉ. राजश्री कल्याणकर ,डॉ. अरुण चव्हाण ,प्रा. विशाल पौळ व इतर सहकारी प्राध्यापकांनी केलेले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या