Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत वीरशैव लिंगायत समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

 


वधु वरांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करावी-अध्यक्ष महादेव इटके

आपला ई पेपर/ परळी / प्रतिनिधी

बारा ज्योतिर्लिंगा पैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथ नगरीत 7 जानेवारी 2024 रोजी संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिर येथे राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाज वधु वर परिचय मेळाव्याचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून याची जय्यत तयारी करण्यात येत असून वधूवरांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करावी असे आवाहन वधु वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष श्री महादेव इटके यांनी केले आहे.

मागील अनेक वर्षांपासून, शहरात पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने, वीरशैव विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे  व वीरशैव समाज परळी यांच्या प्रेरणेने, शहरात राज्यस्तरीय भव्यदिव्य वधू वर पालक परिचय मेळावा भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. याच अनुषंगाने वीरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक दत्ताआप्पा ईटके गुरुजी, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली, वीरशैव विकास प्रतिष्ठान अध्यक्ष श्यामभाऊ बुद्रे, सचिव फुलारी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत, यावर्षीही 7 जानेवारी 2024 रविवारी सकाळी 10 वाजता गुरूलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे हा मेळावा होणार आहे.   वधु वर मेळावा यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य हे प्रत्येक ठिकाणी प्रचार व प्रसार करण्यासाठी फिरत आहेत. विरशैव समाजातील युवक युवतींना याबाबत माहिती व्हावी यासाठी भिंतीपत्रक व पत्रके वाटण्यात आली आहेत. परळी पंचक्रोशीतील गावांसह परिसरातील शहरांमध्ये प्रसार करण्यात येत आहेत.



वधु वर, पालक व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन


वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने, वीरशैव विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे  व वीरशैव समाज परळी यांच्या प्रेरणेने, शहरात राज्यस्तरीय भव्यदिव्य वधू वर पालक परिचय मेळावा  7 जानेवारी रोजी परळी वैजनाथ येथे होणार आहे. या मेळाव्यासाठी विविध ठिकाणचे शिवाचार्य, वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवर, समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. ठिकाणी प्रचार व प्रसार करण्यासाठी फिरत आहेत. विरशैव समाजातील युवक युवतींना याबाबत माहिती व्हावी यासाठी भिंतीपत्रक व पत्रके वाटण्यात येत आहेत. परळी पंचक्रोशीतील गावांसह परिसरातील शहरांमध्ये प्रसार करण्यात येत आहेत. यंदा वधु वर परिचय मेळाव्याचे 6 वे वर्ष असून या मेळाव्यात वधु वरांनी मोठया संख्येने नाव नोंदणी करावी.


-महादेव दत्ताप्पा इटके अध्यक्ष-

वीरशैव लिंगायत समाज वधु वर परिचय मेळावा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या