Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमात किराणा दान


आपला ई पेपर/प्रतिनिधी 
चिखली 

तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे राजमाता मा साहेब जिजाऊ जयंती निमित्त कालकथित भगवान साहेबराव गाडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विष्णू महाराज गाडेकर यांनी दहा हजार रुपये किमतीचा किराणा भेट दिला.तसेच विष्णू घुबे पाटील यांनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमात स्वच्छालय बांधकाम साठी एक ब्रास चुरी दान दिली 

सविस्तर वृत्त असे कि समाजातील उपेक्षित, समाज दुर्लक्षित मुलं असून सुद्धा सांभाळू शकत नाही. भिक्षा मागून किंवा दारोदारी जेवण मागून पोटाची भूक भगवीणारे असे वयोवृद्ध आजी आजोबांना मायेची साथ देत राहणे जेवण औषध उपचार कपडे वर इतर सर्व सुविधा मोफत पुरवून निःस्वार्थ सेवा सुरु असलेल्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे राजमाता मा साहेब जिजाऊ जयंती निमित्त कालकथित भगवान साहेबराव गाडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विष्णू महाराज गाडेकर यांनी दहा हजार रुपये किमतीचा किराणा भेट दिला. यावेळी ब्रेकिंग महाराष्ट्र न्युज चॅनल चे पत्रकार एकनाथ मळेकर विष्णू महाराज गाडेकर, पत्रकार भरत जोगदंडे, ऋषिकेश सोनवणे हे उपस्थित होते.

विष्णू महाराज यांनी वृद्धाश्रमातील वृद्धाच्या सेवे करिता किराणा दान दिला त्याबद्दल तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात चे संचालक प्रशांत डोंगरदिवे वर संचालिका सौं रुपाली डोंगरदिवे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच विष्णू महाराज यांच्या सारखे सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात साठी मदत केल्यामुळे सेवाधारिंचे मनोबल वाढते त्यामुळे त्यांना निराधारांची निःस्वार्थ सेवा करण्याकरिता ताकत मिळेल असे मत पत्रकार एकनाथ मळेकर यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या