Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या नाटकात झळकतोय परळीचा परमेश्वर गुट्टे...


रंगमंचावर अनुभवायला मिळणार 
गावरान तडका, मराठवाडी ठसका!पुरुषोत्तम बेर्डे यांचे 'मुक्काम पोस्ट आडगाव' येणार भेटीला

 आपला ई पेपर/परळी प्रतिनिधी 

नवीन वर्षात रंगभूमीवर नवीन नाटक आणण्याचा मान लेखक- दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना मिळणार असल्याची बातमी यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार २४ जानेवारी पासून 'मुक्काम पोस्ट आडगाव' या नाटकात रसिकांना बेर्डेचा रंगमंचीय गावरान तडका आणि प्रदीप अडगावकरांचा मराठवाडी ठसका अनुभवायला मिळत आहे.दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या व्यावसायिक नाटकात झळकतोय परळीचा परमेश्वर गुट्टे... यांनी यश मिळवले आहे.

रसिकांची नाडी नेमकी ओळखणाऱ्या बेर्डे यांची प्रत्येक कलाकृती नावीन्यपूर्ण, आकर्षक आणि बहारदार असते. आता ते 'मुक्काम पोस्ट आडगाव' हे नाटक रंगभूमीवर आणला आहे. याचा शुभारंभ २४ जानेवारीला दुपारी ४ वाजता यशवंत नाट्यगृहात झाला आहे. अष्टविनायक प्रकाशित, स्नेहा प्रदीप प्रोडक्शन्स आणि अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर निर्मित पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित

या नाटकाद्वारे पुन्हा एकदा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नवीन अभिनेते, अभिनेत्री, गायक, नर्तक आणि वादक पदार्पण करत आहेत.

'रिव्ह्यू' या नाट्यप्रकारात मोडणाऱ्या फॉर्ममध्ये निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी हे नाटक २५ कलावंत तंत्रज्ञांच्या साथीने उभे केले आहे. याला

मराठवाड्यातील मूळ आडगावमधून येऊन औरंगाबाद, पुणे, मुंबईनंतर संपूर्ण जग फिरलेले प्रदीप आडगावकर यांच्या आत्मनिवेदनातून अत्यंत नावीन्यपूर्ण असा नाट्याविष्कार बेर्डे मराठी रंगभूमीवर सादर करणार आहेत 'मुक्काम पोस्ट आडगाव' हा नाट्यप्रयोग दृष्टी सौख्याचा आनंद देणारा असेल असा विश्वास पुरुषोत्तमा बेर्डे यांनी व्यक्त केला आहे.


सौजन्य लोकमत न्यूज नेटवर्क

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या