Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानीज पोदार लर्न स्कूलमध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी

  


आपला ई पेपर/ परळी / प्रतिनिधी 

राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे आज (दि.30 ) जानेवारी मंगळवार रोजी सकाळी 9 वा. महात्मा गांधीजींची पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पोदार लर्न स्कूलमध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. 

पोदार स्कूलचे सहसचिव धिरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी प्रतिमेचे पूजन केले. तसेच उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी गांधींजींच्या जीवन कार्याची माहिती दिली. तर महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याची माहिती देवून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

आजही महात्मा गांधीजींचे विचार लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.दि. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेनी गांधींवर गोळ्या झाडल्या होत्या.

 या घटनेने संपुर्ण देश हादरला होता. गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. 'माझं जीवन हाच माझा संदेश आहे' असं सांगणाऱ्या महात्मा गांधीजींचे जीवन खरंच एक मोठा संदेश आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे केली यात त्यांनीची देशभक्ती दिसून आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या