Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पोदार लर्न स्कूलमध्ये कु.मानसी पींप्रतीवार हिच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

आपला ई पेपर/ परळी / प्रतिनिधी 


राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राजस्थानीज पोदार लर्न स्कूलची इयत्ता दहावीची गुणवंत माजी विद्यार्थी कु.मानसी पींप्रतीवार हिच्या हस्ते ध्वजारोहण मुख्य कार्यक्रम संपन्न झाला आहे. 


या प्रसंगी बोलताना सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करावे. सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.



परळी शहरातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी पोदार स्कूलचे सहसचिव धिरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.



या कार्यक्रमात सहभागी पथकात एन.सी.सी.,एम.सी.सी. , स्काउट गाईड इत्यादी.विभागांनी पथकांच्या संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रात्याक्षिके सादर करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या