Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

उपद्रवमूल्याला मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा हे मोठे शल्य- धनंजय गुडसूरकर


कै.श्यामराव देशमुख स्मृती समारोह सोहळ्याचे शानदार उद्घाटन

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
"उपद्रवमूल्य प्रस्थापित करणाऱ्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळतान दिसते आहे हे असहनीय शल्य असून त्यात होणारी वाढ ही एकंदर सामाजिक संचिताच्या दृष्टीने घातक आहे " असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी केले .
     
येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आज कै.श्यामराव देशमुख स्मृती महोत्सवाचे उद्घाटन श्री गुडसूरकर यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई  देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख होते तर व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख व महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते .

कार्यप्रारंभी विद्येची देवता सरस्वती , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व श्यामराव देशमुख , यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . मान्यवरांच्या  स्वागत समारंभानंतर प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड  यांनी उद्‌घाटन पाहुण्यांचा परिचय करून दिला .
प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्या डॉ . विद्याताई देशपांडे यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून असलेली विजयी घौडदौड तिचा संक्षिप्त आढावा घेतला. कार्यक्रमाचे उद्याटक धनंजय गुडसूरकर यांनी अत्यंत खुमासदार शैलीत प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत घेत बोलत होते. " पूर्वीच्या काळी सामाजिक जीवनात सुजनांचा दबदबा होता मात्र बदलत्या काळात उपद्रवमूल्य  असणाऱ्यांना मिळणाऱ्या सामाजिक  प्रतिष्ठेत वाढ होते आहे  ही चिंतेची बाब आहे असे सांगून ते पुढे बोलताना म्हणाले . विसाव्या शतकातील शोधांनी मनुष्य जातीचे जगणे सुसह्य केले . मात्र त्यातून झालेले सामाजिक नुकसान खूप आहे  सोदाहरण स्पष्ट केले . कल्पित कथा असणाऱ्या चित्रपटांना सेन्सॉर आहे मात्र सामाजिक परिणामांची कोणतीही जबाबदारी नसणाऱ्या हातात असणाऱ्या समाजमाध्यमांनी आपले जगणे असहनीय करून टाकले आहे . या भस्मासुराने मानव जातीचे जगणे अस्वस्थ झाले असून तो सामाजिक स्वास्थाचा शत्रू असल्याचा दावा गुडसूरकर यांनी केला .
        

 प्रा. प्रसाद देशमुख यांनी केलेल्या अध्यक्षीय समारोपानंतर महाविद्यालयातील  गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यांत आला .
  त्यांत  प्रा डॉ - कल्याणकर आर बी . यांना पीएच डी मार्गदर्शक म्हणून मान्यता व त्यांच्या *पौराणिक विशेष नारीचरित्र*  या पुस्तकेचे प्रकाशन करण्यांत आले . प्रा डॉ एस . व्ही . कचरे यांचा पीएच डी मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली , प्रा अशोक पवार यांना म सा प तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबदल तर प्रा डॉ गुळभिले व्ही डी यांच्या बायोकेमेस्ट्री अँड एन्डोक्रायनोलॉजी या पुस्तिकेचे  प्रकाशन झाले या यशस्वी कार्यासाठी वरील अध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी संसदेचे उद्घाटन होऊन या महाविद्यालयातील विविध विद्यार्थिनी प्रतिनिधींचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला. तसेच प्रतिवर्षाप्रमाणे शैक्षणिक वर्ष  मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही या निमित्ताने करण्यात आला.यासोबतच महाविद्यालयांतर्गत झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजकुमार यल्लावाड , प्रा डॉ अरुण चव्हाण व प्रा डॉ कल्याणकर आर बी यांनी केले तर कु. कट्टे ऐश्वर्या अनिल हिने आभार मानले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या