Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्राचार्य अन्वर शेख यांची महाराष्ट्र शासन स्वच्छ्ता मॉनिटर विभागीय समितीवर निवड

आपला ई पेपर | माजलगाव प्रतिनिधी



विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलचे प्राचार्य अन्वर शेख यांची महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ्ता मॉनिटर संभाजीनगर विभागाच्या विभागीय समितीवर निवड करण्यात आली.  त्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, पी एल सी स्वच्छता मॉनिटर हे अभियान स्वच्छतेसाठी आहे. हे अभियान विद्यार्थ्यांना मूलभूत असामाजिक कृत्ये करणाऱ्याला थांबवून झालेली चूक जागीच सुधारण्यास विनंती करण्याची सवय करण्याचे आहे.  दि. ५ डिसेंबर रोजी मा. मंत्री श्री दीपक केसरकर (शालेय शिक्षण) यांनी इतर उपक्रमांसोबत पीएलसी स्वच्छता मॉनिटर – दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले. मा. राज्यपाल श्री रमेशजी बैस आणि मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अभियानाचे अनावरण केले. पी एल सी स्वच्छता मॉनिटर अभियानाचे उद्दिष्ट कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढण्याचे आहे. 

आणि सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांने केवळ स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याने उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र पी एल सी स्वच्छता मॉनिटर अभियान २०२२ आणि २०२३ पहिल्या टप्प्यात वाढता प्रतिसाद आणि परिणाम पाहता २०२३ दुसऱ्या टप्प्याला मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा' ह्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरच्या स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी करण्यात आले आहे. यासाठी वेगवेगळ्या स्तरावर समिती नेमण्यात आल्या आहेत. माजलगाव येथील सिंदफणा पब्लिक स्कूलचे प्राचार्य अन्वर शेख यांची संभाजीनगर विभागाच्या समिती मध्ये निवड करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र प्रकल्प संचालक रोहित आर्य यांनी सांगितले. विभागवार निवड झालेल्या सदस्यांची माहिती स्वच्छ्ता मॉनिटर च्या वेबसाईट वर अपलोड करण्यात आली आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी निवडलेले सदस्य मार्गदर्शन करणार आहेत. 

त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके,सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, उपप्राचार्य राहुल कदम, शैक्षणिक विभाग प्रमुख राजेंद्र सवई, सुजा चाको, धनंजय सोमवंशी, अर्चना जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या