Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईत नवरात्र महोत्सवाचा समारोप ,भक्तांचा मोठा प्रतिसाद

आपला ई पेपर|अंबाजोगाई प्रतिनिधी 


अंबाजोगाईच्या दत्तजयंती नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाने रंगत आली.

महोत्सवात ह.भ.प.प्राची व्यास(डोंबिवली),ह.भ.प.सचिन कन्नडकर,ह.भ.प. मंगेश हिवरेकर (जालना) यांचे किर्तन,पंचमवेद अकादमीच्या वतीने गीतापाठ, शैलेष पुराणिक यांचे सर्वज्ञ दासोपंत यांच्या भक्तीमय पदरचनेवर गायन यांनी अनेक वर्षाची परंपरा लाभलेल्या तसेच सांस्कृतिक व कलात्मक दृष्टीने महत्वपुर्ण असलेल्या दत्तजयंती मार्गशिर्ष नवरात्र महोत्सवातील विविध कार्यक्रमात दत्तभक्तीपर सेवा केली.

दत्त जयंती नवरात्र महोत्सवा निमित्त दत्त संस्थान थोरले देवघर येथे संस्थान अधिपती समीर गोस्वामी,सौ.वैशाली गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी जयंती,मंत्रअनुष्ठान,प्रदक्षिणा, महानिरंजन,अभिषेक,स्त्रोत्र,दासोपंत रचित भजन असे कार्यक्रम उत्साहात झाले रात्रो मंदिर परिसरातील पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन  पत्रकार राहुल देशपांडे यांच्या नियोजनाखाली सुरेख झाले.

 त्यास भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला सायंकाळी गुरूपुजन, अवतारोत्सव, दत्तजयंती निमित्ताने धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले लळित लोककला सादरीकरणाने महोत्सवाचा समारोप करण्यात आला या महोत्सवात महिला, पुरुष,दत्तभक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या