Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणा शाळेची सीबीएसई किशोरवयीन शिखर परिषदेत सखाराम जोशी दिग्दर्शित पथ नाट्यास पारितोषिक

 आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी


येथील विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलने नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या सीबीएसईच्या किशोरवयीन शिखर परिषदेत, सखाराम जोशी दिग्दर्शित पथ नाटयास विशेष जुरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल शाळेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक १९ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२३ या दरम्यान दिल्ली येथे आयोजित केलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ  (सीबीएसई) च्या "जीवन कौशल्य, मानसिक आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण"  किशोरवयीन शिखर परिषदेसाठी भारतातील सीबीएसई संलग्नित ३५०  शाळांनी सहभाग नोंदविला  होता. यामध्ये मराठवाड्याचे प्रतिनिधित्व सिंदफणा पब्लिक स्कूल या एकमेव शाळेने केले होते. विविध राज्यातील आठ विद्यार्थ्यांना घेऊन पथनाट्य बसवण्याची संधी सिंदफना स्कूल मधील,नाट्य शिक्षक सखाराम जोशी यांना ऑनलाइन माध्यमातून दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली होती.


पथनाट्यामध्ये शाळेचे प्रतिनिधित्व शौर्य मुगदिया यांनी केले.तर महाराष्ट्र ,हरियाणा, उत्तर प्रदेश, आसाम,राजस्थान, दिल्ली या ठिकाणाहून विविध शाळेचे  विद्यार्थी सहभागी झाले होते, या सर्व विद्यार्थ्यांचे पथनाट्य ऑनलाइन माध्यमातून बसवण्यात आले. "पालकांच्या विद्यार्थ्याकडून असलेल्या अपेक्षा योग्य की अयोग्य" यावर या पथ नाट्याच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला होता. प्रभावी संवाद, अभिनय, गाणी आणि वाद्याच्या माध्यमातून हे पथनाट्य दिल्ली येथे सादर करण्यात आले, ते परीक्षक आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडले.  प्रथम येण्याचा मान या पथनाट्यास मिळाला . सखाराम जोशी यांनी या पथ नाट्याचा दिग्दर्शनाचा अनुभव आनंददायी होता, विविध राज्यातील संस्कृती आणि विद्यार्थ्यांशी यामुळे जोडता आलं याचा आनंद वाटतो असं सांगितलं. सखाराम जोशी मागच्या तेरा वर्षापासून सिंदफणा पब्लिक स्कूल येथे नाट्यशिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक नाटकं लिहिले व बसवलेले आहेत.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. प्रकाश दादा सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके, सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम, शैक्षणिक विभाग प्रमुख सुजा चाको, अर्चना जाधव, सहभागी विद्यार्थ्यांचे पालक तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या