Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

UPSC | अभिनव पत्की याचा युपीएससीच्या इंडीयन इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षेत भारतात १४ वा क्रमांक

 


आपला ई पेपर अंबाजोगाई येथील रहिवासी अभिनव अरुण पत्की याने आज जाहीर झालेल्या युपीएससीच्या इंडीयन इंजिनिअरिंग सर्व्हिस या परीक्षेत भारतात १४ वा क्रमांक(रँक ) पटकावला आहे.कुठल्याही क्लास ला न जाता सेल्फ स्टडीच्या माध्यमातूनअभिनव याने हे यश संपादन केले आहे.

अभिनव पत्की याचे शालेय शिक्षण येथील भाशिप्र संस्था संचालित खोलेश्वर विद्यालयात झाले. याच विद्यालयात त्याचे वडील वरिष्ठ पर्यवेक्षक पदावर कार्यरत असून गणित विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत.

इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यानंतर तोवालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगलीयेथून सिव्हिल इंजिनिअरची पदवी प्राप्त करूनअभियंता झाला. व टी.सी.ई.कंपनीत त्याने नौकरीही केली. मात्र त्याच्या मनातील प्रशासकीयअधिकारी होण्याची जिद्द कांहीं त्याला स्वस्थबसू देईना. त्याने नौकरी करत स्पर्धा परीक्षेचा

अभ्यास सुरूच ठेवला. कोरोनाच्या पहिल्या वदुसऱ्या लाटेतअसणाऱ्या संचारबंदीत त्याने आपला सर्व वेळ अभ्यासात घालविला. त्याने दोन वेळा युपीएससीच्या परीक्षा दिल्या.पहिल्यावेळी थोडक्यात यश हुकले.मात्र दुसऱ्याझालेल्या युपीएससीच्या इंडीयन इंजिनिअरिंग

सर्व्हिस या परीक्षेत १४ वा क्रमांक पटकावला आहे.

_________________

कठोर परिश्रमातून यश

शालेय शिक्षण घेत असतानाच मला प्रशासकीय अधिकारी होण्याची जिद्द माझ्या मनात होती.ती आज माझ्या मेहनती मुळे पूर्ण झाली. जीवनात कोणतीही गोष्ट सहज शक्य नसते. त्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत.मी दिवसात १२ ते १४ तास सतत अभ्यास केला. नौकरी करत असल्यामुळे कुठल्याही क्लास ला गेलो नाही मात्र स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ग्रंथ हेच गुरु मानून अभ्यास केला.त्याचे चांगले फळ मला मिळाले. युवकांनी निराश न होता धेय्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. यश निश्चित मिळते. मात्र धीर सोडू नका. असे आवाहन ही अभिनव याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केले आहे.

अभिनव व त्याचे पालक शुभांगीअरूण पत्की यांचे व परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

*अबब परळीत अवतरली महाकाय अगडबंब चप्पल*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_8.html*
*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या