आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
येत्या 26 नोव्हेंबर रोजी बौद्धजन संघर्ष समिती परळी तालुक्याच्या वतीने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण केले. तो दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा करतात. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानानुसार राज्यघटनेची देशात अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो.
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे सर्वपक्षीय, विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमास परळी तालुक्यातील आंबेडकरी अनुयांयासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Social Plugin