Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

श्रीगणेश व मारुती मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

 आपला ई पेपर परळी 


येथील बस स्थानकाच्या आवारातील श्री गणपती मंदिरा- तील श्री गणेश व मारुती मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन दि. ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले असून उटीब्रह्मचारी येथील निळकंठेश्वर महादेव मंदिराचे मठाधीपती प.पू.श्री सुरेशजी ब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते दोन्ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे कलशारोहण संपन्न होणार आहे


.

सदरील मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार दि. १० रोजी होणाऱ्या ह्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यास राज्याचे प्राणप्रतिष्ठाकृषिमंत्री ना.धनंजय मुंडे व माजी उपनगराध्यक्ष वाल्मीक अण्णा कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

अनुषंगाने बुधवारी सकाळी श्री गणपती मंदिरापासून मोंढा मार्केट, टावर, जिजामाता उद्यान, घरणीकर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे परत मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.

सदरील प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहान आगारप्रमुख तसेच मंदिराचे संस्थापक कै. डी. एस. क्षिरसागर यांचे चिरंजीव संजय क्षिरसागर मंदिराचे पुजारी पांडुरंग जोशी व एसटी कर्मचारी यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या