Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

चला...त्यांचीही दिवाळी गोड करूया वापरात नसलेले चांगले कपडे व वस्तूंचे दान करुया...

 आपला ई पेपर |Parli 


परळी येथे दिवाळी हा आनंदाचा उत्सव असतो, गोडधोड पदार्थ तयार करणे, नवे कपडे खरेदी करून आनंदोत्सव साजरा करणे असे दिवाळीचे स्वरूप असते. दुर्देवाने काही घटक मात्र आर्थिक अडचणीमुळे असे उत्सव साजरे करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी माणूसकीचा ओलावा  चला त्यांचीही दिवाळी गोड करूया चांगले कपडे (वापरत नसलेले)व वस्तूंचे दान करुया

यापार्श्वभूमीवर मारवाडी युवा मंच, राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आर्थिक दृष्टया अडचणीत असलेल्या घटकांसाठी दिवाळीमध्ये त्यांच्या चेहर्‍यावर स्मित हास्य उमटावे,त्यांचाही उत्सव आनंदात साजरा व्हावा या दृष्टीकोनातून मारवाडी युवा मंच
प्रतिवर्षाप्रमाणे नागरीकांकडून वापरात नसलेले परंतू चांगले असलेले कपडे म्हणजेच साड्या, ड्रेस तसेच विविध वस्तू शुक्रवार दि.१० /११/ २०२३ पर्यंत संकलित करणार आहेत.

संकलित सर्व साहित्य दिवाळीच्या एक दिवस अगोदर गरजवंतांना वितरीत करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरीकांनी वापरात नसलेल्या कपड्यासोबत विविध प्रकारचे साहित्य वैद्यनाथ सहकारी औद्योगिक संस्था सभागृह, श्री नाथ रोड येथे जमा करावेत असे आवाहन मारवाडी युवा मंच, राधा मोहन साथी प्रतिष्ठान परळीच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्याकडील उपक्रमासाठी दान द्यायच्या वस्तू औद्योगिक वसाहत येथे दि.१० नोव्हेंबर पर्यंत जमा कराव्यात अधिक माहितीसाठी 9850213019, 9850715548 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

*परळीकरांसाठी अल्पदरात फराळ |दीपावलीच्या फराळ बुकिंग करिता आजच संपर्क करा...*

🔴👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_6.html*

*परळीकर फराळ बुकिंग करिता आजच संपर्क करा...*
🔴👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या