Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा धक्कादायक खुलासा हे मोठे षडयंत्र घराला नंबर देऊन हल्ला केला आहे हिंसक घटनेची चौकशी करणार...

 आपला ई पेपर Beed 



बीड जिल्ह्यातील जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना संदर्भात खूप मोठे  षडयंत्र आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवल्यानंतर आता परळीची बारी असं म्हणत माझ्याही घरावरती पेटवण्याची भाषा बोलली गेल्याचा धक्कादायक  खुलासा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला..


मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातील जाळपोळ झालेल्या घटनांच्या ठिकाणांची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यातील या संपूर्ण घटनांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे एसआयटी स्थापन करण्याची मागणी करणार. जाळपोळीच्या घटना दिवशी पोलिसांची इटेलिजन्स कमी पडले, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

घराला नंबर देऊन हल्ला

बीडमध्ये ठराविक ठिकाणावर जाणून बुजून हल्ले केले. हल्ले करायचे होते, त्या घराला नंबर दिला होता. हे फार मोठे षडयंत्र आहे. नेत्यांची कार्यालय, घर आणि संस्था, ऑफिसमध्ये जाळपोळ आणि दगडफेक ठरवून कार्यक्रम केला आहे. हे आजच्या पाहणीत लक्षात आले. अचानक घटना झाल्याने पोलीस हतबल होते. या घटनेचा तपास आणि जबाबदार असतील यांना शिक्षा झाली पाहिजे, ही सर्वांची मागणी आहे. गुजर, जाट आंदोलनात असे नव्हते. मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांची भेट घेवून एसआयटी स्थापना करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.


*🔴अस्सल मराठमोळ्या स्पर्श चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार..

*या चित्रपटाने रचला इतिहास*
👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_4.html*

🎯👇👇👇👇👇
*Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*🔴संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या