मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने उपलब्ध
आपला ई पेपर
परळी येथे दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक घराघरात दिवाळी फराळाची मागणी असते. वाढत चाललेली भाव, पदार्थ तयार करण्यासाठी होणारी महिला वर्गांची कसरत आणि त्यातही चांगले पदार्थ तयार करतांना होणारी अडचण लक्षात घेवून मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर आवश्यक असलेले दिवाळीतील फराळ अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मारवाडी युवा मंच, राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी निमित्त आवश्यक असलेले विविध प्रकारचे पदार्थ अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये गोड, तिखट आणि ड्राय फुड अशा प्रकारचे पदार्थ मिळणार आहेत.
मँगो बर्फी, मोतीचूर लाडू, पापडी, मिक्स फरसान, मसाला शेव, काजू कतली, रोज कतली, पिस्ता कतली, ड्रायफुड लाडू, म्हैसूर पाक, कलाकंद असे 60 पेक्षा अधिक अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अधिक माहिती व बुकींगसाठी राधेश्याम झंवर 7420881008, मुरलीधर बंग 9511779585, राजेश मोदाणी 9970030144, प्रकाश वर्मा 9096653579, सोमनाथ गडेकर 9850715548 येथे संपर्क साधावा.
Social Plugin