Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अस्सल मराठमोळ्या ग्रामीण भाग लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार..या चित्रपटाने रचला इतिहास

 


आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व 

-------------------

डॉ.सिध्दार्थ तायडे  यांचे अभिनय-सहदिग्दर्शन

----------------------

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

मराठवाड्याच्या मातीतील अस्सल कलावंत, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांचा समावेश असलेल्या ग्लोबल आडगाव या मराठी चित्रपटाने इतिहास रचला असून भारत सरकारच्या वतीने गोवा येथे डिसेंबर मध्ये  होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ग्लोबल आडगाव हा चित्रपट महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली असून यामुळे सर्वत्र टीम ग्लोबल आडगावचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

ग्लोबल आडगाव' या सिनेमांमधून शेती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर जागतिकीकरण आणि शेतकरी , अशा महत्त्वाच्या विषयावर या चित्रपटा च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या समस्या शेती-मातीचा प्रश्न घेऊन अत्यंत भावनिक ,संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयाला या चित्रपटा च्या माध्यमातून स्पर्श करण्यात आलेला आहे. 'ग्लोबलआडगाव' लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.


 या चित्रपटात जेष्ठ पत्रकार, लेखक तसेच नाटककार रानबा गायकवाड व प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांच्या भूमिका  व सहदिग्दर्शन आहे.

     प्रतिष्ठित गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी  डॉ. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित "ग्लोबल आडगाव" या  उत्कृष्ट मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.या चित्रपटाची निर्मिती शेतकरी पुत्र उद्योजक मनोज कदम, अमृत मराठे यांनी केली असून संत रामदास महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी अभिनय- सहदिग्दर्शन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.

अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठल्ये आणि संदीप पाटील यांच्यासह पाच सदस्यांच्या तज्ञ समितीने 30 चित्रपटामधून या चित्रपटाची काळजीपूर्वक निवड केली होती.  जोरदार कथा आणि कलात्मक उत्कृष्टतेमुळे ग्लोबल आडगावला  

या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात स्थान मिळाले आहे. या चित्रपटाचे निर्माते उद्योजक श्री.मनोज कदम , दिग्दर्शक डॉ अनिलकुमार साळवे आणि सहनिर्माते अमृत मराठे,सहदिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे,कलावंत रानबा गायकवाड यांचेसह सिल्व्हरओक फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट च्या सर्व कलावंतांचे अभिनंदन होत आहे. प्रदर्शनापूर्वीच ग्लोबल आडगाव या चित्रपटाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल मध्ये आपला ठसा उमटविला आहे. लवकरच हा चित्रपट सिने रसिकांच्या भेटीला येणार आहे.

   महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी  आंतरराष्ट्रीय महोत्सवात  चित्रपटाची निवड झाल्याबद्दल डॉ. सिद्धार्थ तायडे व रानबा गायकवाड यांचे अभिनंदन स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे, उपाध्यक्ष डॉ. संभाजी चोथे, सचिव विनायक चोथे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. परदेशी, उपप्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये ,प्रा. भगवान मिरकड ,डॉ. संपदा कुलकर्णी,राजकिशोर मोदी,चंदुलाल बियाणी,बाजीराव धर्माधिकारी, भास्कर नाना रोडे,प्रा. दासू वाघमारे, विधिज्ञ दिलीप उजगरे, प्रोफे. संजय जाधव ,झिलमेवाड दादा,अनंत इंगळे ,बालासाहेब इंगळे,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले,अविनाश मुडेगावकर, प्रा. शंकर शिनगारे, डॉ. बबन मस्के, डॉ. गणेश मुडेगावकर,बा. सो. कांबळे,विकास वाघमारे,डॉ. विनोद निकम, डॉ. राजेश इंगोले,पत्रकार महादेव गोरे,सतीश मोरे,परमेश्वर गित्ते,दादासाहेब कसबे,रणजीत डांगे,संतोष बारटक्के, यांचेसह  सिने नाटय कलावंत संघटनेतील सर्व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या