Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR RPLS | कोणत्याही यशात संपूर्ण टीमवर्क आणि परिवाराचा उत्साह महत्वपूर्ण असतो-सचिव बद्रीनारायण बाहेती

आपला ई पेपर  PARLI  

सध्या सगळीकडे माणसा-माणसांमधील अंतर वाढत चालले असताना बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा हा प्रयत्न आहे. परस्परांतील प्रेम आदर माणुसकीची जोपासना प्रत्येकाने केली पाहिजे. प्रेम, आदर व सत्कार या दिवाळी निमित्ताने आनंद वाढवा म्हणून आज दि.4 नोव्हेंबर रोजी पोदार स्कूल मध्ये एक स्नेहभेट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 


या सोहळ्यात राजस्थानीज पोदार लर्न स्कूल व बचपन स्कूल मधील शिक्षक,शिक्षकेतर परिवारातील कर्मचारी, स्कूल बस वाहक -चालक-मालक तसेच पोदार एज्युकेशन कॅम्पस मधील सर्वच कर्मचाऱ्यांना स्नेह भेट म्हणून दिवाळीनिमित्त शुभेच्छा म्हणून एक भेटवस्तू देण्यात आली.



यावेळी बचपन व राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, बचपन स्कूलच्या प्राचार्या दीपा बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग, प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांची उपस्थिती होती.


गरीब-श्रीमंत असा भेद न करता सर्वांवर जसे दिवाळीतील पणतीचा प्रकाश, प्रत्येकाच्या घरात आनंदाची प्रकाशाची बरसात करतो तसे हे बचपन व राजस्थानीज पोदार लर्न स्कूल परिवारातील स्नेह भेट सोहळा हा दिवाळीचे वैशिष्ट्य; आहे.कारण कोणत्याही विजयाच्या जल्लोषात संपूर्ण टीम वर्क आणि परिवाराचा उत्साह हाच महत्वपूर्ण असतो म्हणून या आनंदात सर्वांच्या घरात दिवाळी आनंदमय व्हावी म्हणून ही छोटीशी भेट... सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे असे मनोगत यावेळी शाळेचे सचिव बद्रीनारायण  बाहेती यांनी व्यक्त केले आहे


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला हा सण म्हणजे दिवाळीतील अविस्मरणीय चैतन्यपर्व ठरावे ..

*🔴विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि बौद्धीक असा सर्वांगीण विकास होतो -डॉ.संतोष मुंडे*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*

*🔴विज्ञान प्रदर्शनातून नव्या संकल्पनांचा वाव मिळतो -पो.नि.सलीम चाऊस*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*

*🔴पोदार लर्न स्कूल मध्ये ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या