विज्ञान प्रदर्शनातून नव्या संकल्पनांना वाव मिळतो -पो.नि.सलीम चाऊस
पोदार लर्न स्कूल मध्ये ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
परळी प्रतिनिधी
परळी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती व राजस्थानीज पोदार लर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने परळीतील पोदार लर्न स्कूल येथे आज सोमवार दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे सचिव बद्रीनारायण बाहेती ,डॉ. संतोष मुंडे, डॉ.अरुण गुट्टे,श्रीमती हिना अन्सारी,जयवर्धन सुर्यवंशी आदींचे उपस्थिती होती. यावेळी यांचे पुष्पगुच्छ देऊन व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
प्रत्येक विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होतो. त्यातून मानवाच्या उत्क्रांतीसाठी पोषक असलेल्या गोष्टींचा शोध लागतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय अभियान उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, तसेच पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, यांनीही तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या विज्ञान प्रदर्शनातून नव्या संकल्पनांना चालना मिळते व शिक्षणाची सोबतच विज्ञानाच्या आवड निर्माण होते. तर उपमुख्य अभियंता, अमित बनकर यांनी विज्ञानाच्या विघातक आणि विधायक बाजू विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
परळी गंगाखेड महामार्गावरील पोदार लर्न स्कूल येथे ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन २०२३-२४ चे
मान्यवरांच्या हस्ते आज दि ३० रोजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी विशेष आमंत्रित म्हणून परळी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरूण गुट्टे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती हिना अन्सारी, परळी औ.वि. केंद्र अधिक्षक अभियंता एस. एन.बुक्तरे ,उपमुख्य अभियंता अमित बनकर ,औ.वि. जयवर्धन सुर्यवंशी सहा.अभियंता, डिस्कव्हरी सायन्स सेंटर प्रमुख विष्णु जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.तुकाराम गुट्टे, सिंदफणा विद्यालयाचे प्राचार्य अन्वर शेख आदींच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला
५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग, प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे.
राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे ३१ ऑक्टोबर ते १नोव्हेंबर या कालावधीमध्ये हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थी व सर्वांसाठी खुले राहणार आहे. दि.१नोव्हेंबर रोजी दुपारी या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
या प्रदर्शनात पर्यावरण संवर्धन, वाढते प्रदूषण आणि त्यावरील उपाय, पर्यावरण आणि हवामान बदल, गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता आदि विषयांना घेऊन विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रयोगाचे सादरीकरण केले. याचे परीक्षण आणि मूल्यांकन केले जाऊन विद्यार्थ्यांचे क्रमांक काढले जाणार असून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे तसेच यावेळी ते म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या तर्कबुद्धीला वाव मिळतो, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांच्या प्रगतीच्या वाटा खुल्या होतात आणि आपल्याला भविष्यातील शास्त्रज्ञ मिळतात त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व प्रोत्साहन म्हणून हे सन्मान केले जाणार आहेत.
तालुक्यातील सर्व शाळेतील 110 विज्ञान प्रयोग घेऊन विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य मंगेश काशिद यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक बालाजी आघाव ,दिनेश जतपाल यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Social Plugin