Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक अपघातात वकीलाचा जागीच मृत्यू

 



अंबाजोगाई न्यायालयातील ऍड.संदीप रूपनर यांचे निधन

आपला ई पेपर अंबाजोगाई 

भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत अंबाजोगाई न्यायालयातील ऍड.संदीप नवनाथ रुपनर वय २४, रा. ममदापुर, ता.परळी यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शुक्रवारी दि.०३ दुपारी २ वाजताच्या सुमारास मांडेखेल शिवारात झाला.

ऍड.संदीप रुपनर यांनी सामान्य परिस्थितीतून पुढे येत वकिलीचे शिक्षण घेतले. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी उत्कृष्ट कार्य पद्धतीमुळे वकिली क्षेत्रात चांगले नाव कमावले होते. ते शुक्रवारी दुपारी परळी न्यायालयातील कामकाज आटोपून अंबाजोगाई न्यायालयात येण्यासाठी निघाले होते. मार्गात मांडेखेल शिवारात समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अनेक वकील बांधवानी स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. ऍड. संदीप रुपनर यांच्या मृत्यूमुळे एक उमदा तरुण सहकारी गमावला अशी भावना वकील संघाकडून व्यक्त होत आहे.


*🔴संभाजीनगर पविपो महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांची परळी येथे पत्रकार परिषद*
👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/parli.html*

*🔴पोदार लर्न स्कूल मध्ये ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*

*🔴विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि बौद्धीक असा सर्वांगीण विकास होतो -डॉ.संतोष मुंडे*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*

*🔴विज्ञान प्रदर्शनातून नव्या संकल्पनांचा वाव मिळतो -पो.नि.सलीम चाऊस*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या