दिवाळी निमित्त पहाट गाणी प्रसिद्ध गायक राजेश भावसार व पार्श्व गायीका संगीता भावसार यांचा गीत गायनाचा कार्यक्रम
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
मारवाडी युवा मंच व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने दिवाळी निमित्त पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील २१ वर्षांपासून दिवाळी आणि पहाट गाणी हे शहरातील गीत संगीत रसिकांचे एक समिकरण ठरलेले आहे. परळी शहरातील नाथ रोडवरील औद्योगिक वसाहत सभागृहात रविवार (ता.१२) पहाटे ५:३० वाजता दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी परळी शहरातील खास रसिकांसाठी स्वरमिलाफ ऑर्केस्ट्रा चे सादरीकरण होणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथील प्रसिद्ध गायक व संगीतराज म्युझिक ग्रुप व कॉन्सर्ट चे राजेश भावसार व गायीका संगीता भावसार यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दिवाळी निमित्त पहाटेची भक्तिगीते, जुने-नवे मराठी व हिंदी अविट गोडीची गाणी असणार आहेत. तसेच कानाला तृप्त करणारं सुश्राव्य संगीताची मेजवानी परळीकरांसाठी असणार आहे.
या कार्यक्रमास शहरातील रसिकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन मारवाडी युवा मंच व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान चे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव जयपाल लाहोटी व कार्याध्यक्ष विजय वाकेकर यांनी केले आहे.
Social Plugin