Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना कपडे वाटप..

आपला ई पेपर parli vaijnath 


परळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून, शहरातील गरजवंत नागरिकांना तसेच गरजू व्यक्तींना कपडे वाटप करण्यात आले. 

अनेकांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे दिवाळी सणाला कपडे घेणे होत नाही अशा परिस्थितीत त्यांचे दिवाळी गोड करण्यासाठी मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठान पुढे सरसावले आणि शहरातील औद्योगिक वसाहत सभागृहात गरजूंना दररोज घालावयाचे कपडे, साड्या, लहान मुलांचे ड्रेस वाटप करण्यात आले. 


यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हास्य पाहून मनस्वी आनंद झाल्याचे राधा मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगितले.

यावेळी मारवाडी युवा मंचाचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव जयपाल लाहोटी रतन कोठारी,रतन कोठारी,सतिश सारडा,बालचंद लोढा, ओम मुंदडा, देवराव कदम,अँड मनजीत सुगरे,जयप्रकाश बियाणी, सचिन स्वामी आनंद हाडबे, अमर रोडे सोमनाथ गडेकर,आनंद तूपसमुद्रे, हरीचंद्र चौरे,संजय देवधारे विठ्ठल सोळंके,अजय रोडे,गणेश सावळे,उषाताई बनसोडे आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या