Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'देव तारी त्याला कोण मारी' प्रमाणे सहा गोवंशाच्या संगोपनाची राम रक्षा गौशाळेने घेतली जबाबदारी

आपला ई पेपर/परळी/प्रतिनिधी


बीड जिल्ह्याच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. आता अनेकांना हे पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ते विक्री करतात.  

कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात पशुधन नेला जात असल्याने पशुधनाची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.अशीच घटना परळीतील अंबाजोगाई महामार्गावर असलेल्या वैद्यनाथ महाविद्यालय समोर   परळीतील कार्यकर्त्यांनी गुरुवार दि.(१७) रोजी रात्री ११वा.चारचाकी मालवाहू वाहन अडवून तपासणी केली. त्यात सहा गोवंश आढळून आल्याने.सदर सहा गोवंश कत्तलीसाठी नेल्या जात होते हे चौकशीमध्ये निष्पन्न झाले तेव्हा तात्काळ त्यांना परळी पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी' प्रमाणे सहा गोवंशाच्या संगोपनाची राम रक्षा गौशाळेने घेतली जबाबदारी.

आराेपीं वाहन चालक मुस्तफा इनामदार रा.केज हा जनावरे खरेदी करून ती MH44 U1521 क्रमांकाच्या चारचाकी मालवाहू वाहनाने परळी येथील बरकत नगरच्या कत्तल खाण्यात नेली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक कार्यकर्त्य योगेश पांडकर, दिपक क्षीरसागर, बळीराम परांडे, राम जाधव यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी अंबाजोगाई महामार्गवर वैद्यनाथ महाविद्यालय जवळ सापळा रचून वाहनाची तपासणी केली. त्यात सहा गोवंश आढळून आले. वाहनचालकांकडून सदर गोवंश कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले तेव्हा सदर बाब 

परळी पोलिसांना कळविण्यात आली. तेव्हा वाहनासह सहा गोवंश परळी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. परळी शहर पोलीस निरीक्षक नागरगोजे व पोहे.भताने यांनी सखोल चौकशी करून आरोपींना ताब्यात घेतले. व त्यातील दोन गोवंशची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांना रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये उपचार करून परळी पोलिसांनी सहकार्य करून सकाळी ती सहा गोवंश राम रक्षा गाेशाळेत पाठविली आहेत.

सदर गाडीचे चालक यांचे विरुद्ध कायदेशिर फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन परळी शहर ला गुरनं 203/2023 कलम 11(1)(घ) 11(1)(ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधि. 1960 अनन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास करत आहेत.

तरी सदर गुन्हयातील जप्त मुद्देमाल पैकी सहा बैल यांचे काळजी व संरक्षणाची गरज असल्याने त्यांना रामरक्षा प्रतिष्ठाण संचलीत, रामरक्षा गोशाळा परळी-अंबाजोगाई रोड भोपला पाटी ता परळी वै. जि. बीड येथील गोशाळेत चारा-पाण्याचे निवाराचे व्यवस्थेसह संभाळण्यास दिली आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या