Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कर्मचाऱ्यांनासह गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये



५२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण थाटामाटात संपन्न 


आपला ई पेपर/ परळी /प्रतिनिधी   


 परळी औष्णिक वीज  केंद्राच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता डॉ.अनिल काठोये म्हणाले की, पाणी आणि कोळशाअभावी कोणत्याही परिस्थितीत परळी वीज निर्मिती बंद पडणार नाही यासाठी महानिर्मिती मुंबईचे कार्यालय प्रयत्नशील आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.५२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षिसाचे वितरण करण्यात आले.

    याबाबत अधिक माहिती अशी की, परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचा ५२ वा वर्धापन दिन दि.१५ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जुने क्लब बिल्डींग, खुले रंगमंच येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये म्हणाले की,परळी वीज निर्मिती केंद्रात सध्या वर्षभर पुरेल इतके पाणी आणि कोळसा साठा उपलब्ध  होईल. परंतु भविष्यात आपल्यासमोर काही आव्हाने आहेत. मुख्यता कमी मनुष्यबळ असतानाही आपल्याला पुढे जायचे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही एक प्रकारे आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

     वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी स्पर्धातील विजेते यांचे अभिनंदन केले व  पारितोषिक वितरण केले तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा व सर्पमित्र सुग्रीव शेप यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.अभियंते,कर्मचारी, तंत्रज्ञ, कंत्राटी लेबर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढेही आपल्या केंद्राचे उत्कृष्ट परंपरा अधिकारी- कर्मचारी पुढे नेतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी  उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, अधीक्षक अभियंता एस एन बुकतारे, धनंजय कोकाटे, प्रसन्न कुमार गरुड,राजीव रेड्डी,श्रीधर नागरगोजे ,रोहिदास आव्हाड ,सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड, डॉ जे रांदाड ,सौ उल्का काठोये, सौ मनीषा अवचार, सौ एच के गित्त, परमेश्वर नागरगोजे, विद्यासागर मुंडे,आदींची मंचावर  उपस्थिती होती. 

    महानिर्मिती मुंबईचे  व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष डॉ. पी.अनबलगन (भा. प्र. से .)यांनी ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठविला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मराठवाडा आणि राज्याच्या विकासात परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे. निर्मिती केंद्र आगामी बदलते अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपली भव्य परंपरा कायम राखील यात संशय नाही.

  आगामी अपारंपारिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे ही त्यांनी स्वागत केले तसेच त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत कार्यक्षमता, वृद्धी, पर्यावरण संवर्धन बाबत प्रत्येक विभागाने आपले योगदान व्हिजन २०३० नुसार द्यावे असे आवाहन केले. महान निर्मिती आगामी काळात २५ गिगावॉट लक्ष निर्धारित केले आहे असे सांगितले. तसेच संचालक संजय मारुडकर, संचालक अभय हरणे, कार्यकारी संचालक राजेश पाटील, संचालक धनंजय सावळकर, चंद्रपूरचे मुख्य अभियंता गिरीश कुमारवार, नाशिकचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे, फोपळीचे मुख्य अभियंता यांनीही वर्धापन दिनानिमित्त  शुभेच्छा संदेश पाठविले.

या सोहळ्याचे प्रस्ताविक हिम्मतराव अवचार यांनी केले तर सूत्रसंचालन महेश होनमाने आणि महेश मुंडे यांनी केले.आभार धर्मराज मस्के यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या