Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

MIM| परळीत मुस्लिम आरक्षणासाठी आज पासून आमरण उपोषण

 


कंत्राटी नोकर भरतीचा आदेश रद्द करण्यासाठी सर्वानी सहभागी व्हावे 

आपला ई पेपर 

परळी प्रतिनिधी मुस्लीम समाजाला शैक्षणीक, राजकीय आरक्षण मिळणे व नौकर भरती बाबत खाजगी एजन्सी ( गुत्तेदार) मार्फत भरती प्रक्रीयेचा शासन निर्णय रद्द करून मागे घेण्याच्या मागणीसाठी  आज शुक्रवार दि.13

परळीत शाहीन बाग (पोलिस ठाणे समोर) मैदानावर आमरण उपोषण एम.आय.एम.पक्षाच्या वतिने तालुकाध्यक्ष शरीफ शेख यांच्या सह मुस्लिम बांधवांचे आमरण उपोषणांस बसणार आहेत.मुस्लिम आरक्षण मिळविण्यासाठी व कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीचा आदेश रद्द करण्यासाठी सर्वानी सहभागी व्हावे असे आव्हान शहराध्यक्ष  कादर कुरेशी यांनी केले आहे.

 परळी एम.आय.एम.पक्षाच्या वतिने निवेदनाच्या माध्यमातून  मुस्लीम समाजाला शैक्षणीक, राजकीय आरक्षण मिळणे व नौकर भरती बाबत खाजगी एजन्सी ( गुत्तेदार) मार्फत भरती प्रक्रीयेचा शासन निर्णय रद्द करून मागे घेण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते.

 07 दिवसांच्या आत निवेदनची दखल घेतली नाही तर परळीत शाहीन बाग (पोलिस ठाणे समोर) मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला गेला होता. अद्यापही मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळे एमआयएमच्या वतीने शुक्रवार दि.13

परळीत शाहीन बाग (पोलिस ठाणे समोर) मैदानावर एम.आय.एम. पक्षाच्या वतिने तालुकाध्यक्ष शरीफ शेख यांच्या सह मुस्लिम बांधवांचे आमरण उपोषणांस सुरुवात होणार असून जो पर्यंत मुस्लीम समाजाला शैक्षणीक, राजकीय आरक्षण मिळणे व नौकर भरती बाबत खाजगी एजन्सी ( गुत्तेदार) मार्फत भरती प्रक्रीयेचा शासन निर्णय रद्द होत नाही तो पर्यंत हे आमरण उपोषण सुरूच  ठेवण्यात येणार असल्याचे एम आय एम पक्षाच्या वतीने प्रशासनाला कळविण्यात आले असून मागण्या पदरात पाडुन घेण्यासाठी या एम आय एम पक्षाच्या आमरण उपोषणाला सर्व नागरिकांनी पाठिंबा देण्यासाठी व सहभागी व्हावे असे आव्हान शहराध्यक्ष  कादर कुरेशी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या