Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानीज पोदार लर्न स्कूलची कु.श्रावणी नवनाथ मुंडे विद्यार्थिनीचे निबंध स्पर्धेत सुयश

आपला ई पेपर|परळी | प्रतिनिधी 

परळी येथील शिक्षणमहर्षी कै. विठ्ठलराव तांदळे सर यांच्या जयंती निमित्त आयोजित 'ज्ञानकुंभ सप्ताह सोहळा' अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात निबंध स्पर्धांमध्ये एकूण 20 शाळा सहभागी झाल्या होत्या 1333 विद्यार्थी सहभाग घेतला होता. त्यामध्ये लहान गटातून राजस्थानीज पोदार लर्न स्कूलची कु.श्रावणी नवनाथ मुंडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे आज दि.12 ऑक्टोबर रोजी संस्कार विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापकअमर गायकवाड, यांच्या हस्ते तिला 2100/- रु. बक्षीस, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.यावेळी सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील संस्कार शाळेची क्रीडाशिक्षक गोपानपाळे उपस्थित होते. 

शालेय समितीच्या वतीने कु.श्रावणी नवनाथ मुंडे या विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन करण्यात आले. अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनीही अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या