Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

उद्या परळीत भव्य शोभायात्रा..| तुळजापूर ते परळी पायी अखंड ज्योतीचे शोभायात्रा काढण्यात येणार चंदुलाल बियाणी






नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गा महोत्सवाची ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते घटस्थापना चंदुलाल बियाणी

आपला ई पेपर/परळी/प्रतिनिधी

नाथ प्रतिष्ठान व राधा मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दुर्गात्सव साजरा करण्यात येत आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी (ता १५) सायंकाळी ५:३१ वाजता दुर्गादेवी व घटस्थापना करण्यात येणार आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नाथ प्रतिष्ठान व राधा मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने दुर्गोत्सव साजरा करण्यात येत आहे. नाथ रोडवरील औद्योगिक वसाहत सभागृह येथे यावर्षी तुळजापुर येथील आई तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची हुबेहूब प्रतिकृती व घटस्थापना करण्यात येणार आहे. 

डोंगरगढ, छत्तीसगड येथील २००० वर्ष जुन्या माता बम्लेश्वरी मंदिर प्रमाणे ९ दिवस २११ अखंड दिव्य ज्योती दर्शन व सहभाग संधी. दोन्ही बाजुने २५ फुट उंच चिरेबंदीची भिंत व आकर्षक विद्युत रोषणाई, ओटी भरण्यासाठी तसेच पुजेसाठी लागणाऱ्या सामानाची छोटी-मोठी दुकानाचे स्टॉल, प्रभु वैद्यनाथ दर्शन व भव्य दिपमाला यावर्षी पाहता येणार आहे. १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान सकाळी १० ते रात्री १० पर्यंत देखावा पाहण्यासाठी खुला असणार आहे. दैनंदिन आरती दररोज सकाळी १० वाजता व सायंकाळी ८ वाजता असणार आहे. 

दैनंदिन पुजा सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत असणार आहे. तुळजापूर ते परळी पायी अखंड ज्योत यात्रेचे रविवारी (ता. १५) परळीत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक तथा राधा- मोहन साथी प्रतिष्ठान चे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या