Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जुन्या पिढीतील लढावू व्यक्तिमत्त्व हरवले |अशोकराव पाठक यांचे निधन ॲड.अरुण पाठक यांना पितृशोक

आपला ई पेपर परळी वै प्रतिनिधी

परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्व तसेच जुन्या काळातील एक लढाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले औष्णिक विद्युत केंद्रातील सेवानिवृत्त अशोकराव पाठक यांचे आज रविवार दि.१५ रोजी सकाळी निधन झाले. मृत्यू समयी ते 69 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अशोकराव सुंदरप्रसाद पाठक हे परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. एक अग्रेसर व अन्यायाविरुद्ध लढणारे लढाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची सर्वपरिचितांमध्ये ओळख होती. मूळ (उखळी बु.) येथील रहिवासी असलेले अशोकराव पाठक हे औष्णिक विद्युत केंद्रात अनेक वर्ष कार्यरत होते. त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारा दरम्यानच त्यांची आज प्राणज्योत मालवली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड अरुण पाठक यांचे ते वडील होत.

दरम्यान दिवंगत अशोकराव पाठक यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथील मोक्षदाम स्मशानभूमीत आज रविवार दि.१५ सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या