Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पोदार लर्न स्कूलचा चि.अर्णव राजेश जाजूची राज्य पातळीवरील बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेसाठी निवड

आपला ई पेपर|परळी | प्रतिनिधी


परळी येथील राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे गुरुवार (दि 26) रोजी आयोजित विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत मराठवाड्यातील सर्व जिल्हातील 210 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचा विद्यार्थी चि.अर्णव राजेश जाजू याने विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. 

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधून त्याची राज्य पातळीवरील बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत खेळण्यास त्याची निवड झाल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.अशी माहिती शाळेचे सहसचिव धिरज बाहेती यांनी दिली आहे. 

चि.अर्णव राजेश जाजूची राज्य पातळीवरील बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल, विद्यार्थ्याचे पालक डॉ.राजेश जाजू ,आई सौ.अमिता जाजू यांचे राजस्थानी पोदार लर्न स्कूल शालेय समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. 

यावेळी अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

पोदार लर्न स्कूलचा विद्यार्थी चि.अर्णव जाजूचे यशस्वी नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच मार्गदर्शक क्रिडाशिक्षक यांचे ही राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील स्पर्धेचे संयोजक सिताराम कराड, सुशील कटके ,रूपाली सावंत, अंकुश पवार,किरण देशमुख,भाग्यश्री गुट्टे ,श्रीराम विटेकर आदींनी परिश्रम घेतले.

*परळी येथील पोदार लर्न स्कूल येथे झालेल्या "दांडिया  नाईट" महोत्सवला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...*

 *दांडिया नाईट या कार्यक्रमाची एक झलक..... 

👇👇👇

👇👇👇👇👇

😎😎😎😎💃💃

*https://youtu.be/CItDhQeVtRw?feature=shared*


*थेट...live परळीत पोदार लर्न स्कूल येथे विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा*

*https://m.facebook.com/groups/312514163199265/permalink/1021384128978928/?mibextid=Nif5oz*

🎯👇👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_32.html*

*Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या