Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत दम्याचे औषधी मोफत,वैद्य स्व.चंदुलाल कलंत्री यांचे आयुर्वेद औषधी दम्याच्या रुग्णांसाठी उपलब्ध- चंदुलाल बियाणी

पला ई पेपर /परळी/प्रतिनिधी


कोजागिरी पोर्णिमेच्या निमित्ताने दम्याच्या आजाराने त्रस्त झालेल्या रूग्णांसाठी प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य स्व.चंदुलाल कलंत्री रा.तेलगाव जि.बीड यांचे औषध परळी शहर व परिसरातील नागरीकांसाठी मोफत उपलब्ध करून देत असल्याची माहिती राधा -मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली आहे. यासाठी 28 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.


1940 पासून चालू असलेल्या परंपरेनुसार तेलगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य स्व. चंदुलालजी कलंत्री यांच्या वतीने कोजागिरी  पोर्णिमेनिमित्त दम्याच्या रूग्णांसाठी राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आयुर्वेद औषधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.


28 ऑक्टोबर रोजी दै.मराठवाडा साथी कार्यालय गुरूकृपानगर परळी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिले जाणार असून 28 ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहण असल्याने दिलेले औषध रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी दिवसभर उपवास ठेवून  रात्री 12 नंतर दुधासोबत औषध घ्यावे. 


शहर व परिसरातील गरजू रुग्णांनी या औषधाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठी मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी
9422542756, मुरलीधर बंग- 9511779585, राधेशाम झंवर,
7420881008,राजेश मोदाणी,
9970030144,प्रकाश वर्मा,आनंद हडबे- 9850213019 येथे संपर्क साधावा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या