Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

| PODAR-RPLS | पोदार लर्न स्कूल येथे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

 परळी |आपला ई पेपर|प्रतिनिधी | PODAR-RPLS

PODAR-RPLS परळी येथील राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे( दि 26) गुरुवार रोजी सकाळी 9 वा. क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे . विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंग टाईम 9 वाजता असून 10 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल.

या विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा प्रमुख अतिथी म्हणून परळी गट शिक्षणाधिकारी कनाके सर यांच्या प्रमुख उपस्थितीत या विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या खेळला प्राधान्य द्यावे व या प्रेरणेतून प्रोत्साहन मिळावे म्हणून PODAR-RPLS पोदार शाळेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी,

 PODAR-RPLS सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा नियोजनबद्ध पद्धतीने होणार आहेत.बीड जिल्ह्यातील तसेच 

परळी तालुक्यात खेळाडूंसाठी प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने पोदार स्कूलमध्ये या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती PODAR-RPLS पोदार शाळेचे शिक्षक , संयोजक सिताराम कराड यांनी दिली आहे. 


राजस्थानीज पोदार स्कूल येथे होणाऱ्या शालेय विभागीय  बुद्धिबळ स्पर्धेत  14, 17 व 19 वर्षांखालील वयोगटातील मुले-मुलीनीचा सहभाग असणार आहे. तालुक्यातील सर्व माध्यमिक, प्राथमिक शाळानी आपल्या शाळेतील खेळाडू स्पर्धेमध्ये उतरवून स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन 

परळी तालुका क्रिडा प्रमुख संजय उर्फ पापा देशमुख सर व संयोजक  सिताराम कराड यांनी केले आहे.संपर्क संजय उर्फ पापा देशमुख सर  98228 33554 संयोजक पोदार शाळेचे सिताराम कराड 9890398771


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या