Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जीवन सफल करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हीग एक चिंतन


कपिलधार संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी येथे आर्ट ऑफ लिविंगचे ऍडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम शिबिर संपन्न

Aplaepaper 
परळी वैजनाथ प्रतिनिधीसंत शिरोमणी श्री मन्मथ माऊलीच्या संजीवन समाधीने पावन झालेली तपोभूमी व मनाला हे लावून सोडणारे निसर्गरम्य ठिकाण कपिलधार जिल्हा बीड येथे एक ते चार ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये 137 साधकांनी ऍडव्हान्स मेडिटेशन तसेच 47 साधकांनी सहज समाधी ध्यान शिबिर केले.
 या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून आदरणीय श्री रत्नेश्वर दादा व सौ शर्मिला ताई शेटे यांनी काम पाहिले. या शिबिरासाठी परळी वैजनाथ, अंबेजोगाई घाटनांदुर, पुस, माजलगाव, बीड, जालना, परभणी, नांदेड, लातूर, गंगाखेड, सोलापूर, पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई तसेच  इतर अनेक गावातील साधक उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वीततेसाठी प्रशिक्षक सौ रेणुका चौधरी, विश्वनाथ गडकर, शर्मिला काळे, संजय कुलकर्णी, शिरीष चौधरी इतर अनेक प्रशिक्षक उपस्थित होते. आर्ट ऑफ लिविंग परिवाराने श्री मन्नत स्वामी ट्रस्टचे सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच सर्वांचे आभार मानले.


जीवन सफल करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हीग एक चिंतन : रजनीताई मंगलगे
शिवदास माऊली सांगतात जीवनात आल्यानंतर ईश्वर चिंतन घडल पाहिजे. खरच जर आपल्याला आपल्या जीवनाचा शोध घ्यायचा असेल, आपले मन विकृत होऊ नये असे वाटत असेल, आपल आरोग्य चांगले रहावे वाटत असेल, मी कोण आहे हा शोध घ्यायचा आहे असे वाटत असेल तर आर्ट ऑफ लिव्हींगचा बेसीक कोर्स आणी ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स करायला पाहिजे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या