Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वैद्यकिय अधिकारी डॉ. तुकाराम गुट्टे यांचा नाथ शिक्षण संस्थेकडून सत्कार

आपला ई पेपर परळी वैजनाथ प्रतिनिधी 

उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे वैद्यकिय अधिकारी पदाचा डॉ. तुकाराम वैजनाथ गुट्टे यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.अरुण गुट्टे यांची उपस्थितीत होते. नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुछ फेटाबांधून स्वागत करून यथोचित सत्कार करण्यात आला.

परळी तालुक्यातील दैठणा येथील राहिवाशी कर्तव्यदक्ष वैद्यकिय अधिकारी डॉ.तुकाराम वैजनाथ गुट्टे हे गडचिरोली येथील सिरोंचा ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकिय अधिकारी या पदावर सेवा बजावली आहे. आरोग्य क्षेत्रात उत्क्रुष्ट वैद्यकीय सेवा दिली.दुर्गम आणि नक्षलग्रस्त क्षेत्र आणि महाराष्ट्राचे अंतिम टोक असलेल्या ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे 3 वर्षे स्वेच्छेने सेवा दिली.  त्यांच्याकडे आता परळी उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकिय अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. 

परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकिय अधिकारी पदाचा डॉ. तुकाराम गुट्टे यांनी स्वीकारला पदभार आहे. नविन वैद्यकीय अधिकारी यांचे नाथ शिक्षण संस्था व मित्र मंडळीच्या वतीने सत्कार करुन स्वागत केले आहे. डॉ. तुकाराम गुट्टे हे परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील उद्योजक बालासाहेब फड, माणिकभाऊ फड, सुरेश नाना फड यांचे ते जावई आहेत. 

यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. अरुण गुट्टे, कै.रामभाऊ (अण्णा) खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे,  सुरेश (नाना) फड, सायस गित्ते सर, बालाजी फड, सोपान चाटे, प्रितम जाधव, प्राचार्य अतुल दुबे, अंकुश फड सर, भास्कर आधळे सर, अकबरभाई,  प्रा. किरण शिंदे, गोविंदराव मुंडे, सूर्यकांत कातकडे, केशव तिडके, गोविद मुंडे,सं. अधीक्षक रामधन कराड, डॉ. निळे सर, भक्तराम फड, माजी सेनिक केंद्रे, सादेक शेख, संजय वरवटकर, सूरज राऊत, आदी उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या