Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत कविता रंगते कोजागिरीत रसिकांसाठी निमंत्रित कविंची बहारदार काव्यमैफल


आपला ई पेपर Parli 

कोजागिरी पौर्णिमे निमित्त मसाप च्या वतीने शनिवारी 
परळी/प्रतिनिधी
      कोजागिरी पौर्णिमे निमित्त परळीकर रसिकांसाठी "कविता रंगते कोजागिरीत" या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेने उद्या शनिवारी (ता. २८) सायंकाळी सात वाजता औद्योगिक वसाहत सभागृहात आयोजित केले आहे.


     काव्यमैफील गाजवण्यासाठी वास्तववादी सामाजिक जाणिवा मांडत विविध विषयावर भाष्य करणारे आणि हास्य पिकविण्यात तरबेज असणारे करमाळा येथील प्रा. डॉ.सुरेश शिंदे, 'दंगल' सारख्या कवितेने महाराष्ट्राला वेड लावलेले सोयगाव  येथील डॉ. स्वप्नील चौधरी , देशभक्ती व सामाजिकता हा ज्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. इतकेच काय तर रसिकमनात दीर्घकाळ घर करून राहण्याचं सामर्थ्य ज्यांच्या कवितेत आहे असे सिल्लोडचे शब्बीर शेख , महाराष्ट्र पोलिसात आपली सेवा बजावणाऱ्या व तितक्याच संवेदनशीलतेने काव्याचा प्रांत समृद्धपणे हाताळणार्‍या पुण्याच्या कवयित्री बालिका ज्ञानदेव आणि गझलेच्या प्रांतात परळीचे नाव महाराष्ट्रभर करणारे दिवाकर जोशी हे महाराष्ट्रातील दिग्गज कवी यावर्षी या निमंत्रितांच्या कविसंमेलनात सहभागी होत आहेत.


      कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून  "कविता रंगते कोजागिरीत" हा निमंत्रित कवींच्या कविसंमेलनाचा कार्यक्रम आणखीन रंगतदार होईल तो चोखंदळ परळीकर रसिक श्रोत्यांमुळे ...
        म्हणून "कविता रंगते कोजागिरीत" या कार्यक्रमासाठी परळी व परिसरातील सर्व साहित्य रसिकांनी उद्या शनिवारी (ता.२८) सायंकाळी सात वाजता परळी येथील औद्योगिक वसाहत सभागृहात रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन 

मराठवाडा साहित्य परिषदेचे परळी शाखेचे अध्यक्ष मा. चंदुलाल मोहनलालजी बियाणी,  सचिव प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड, कार्याध्यक्ष श्री अनंत मुंडे, उपाध्यक्ष प्राचार्य अरुण पवार, कोषाध्यक्ष प्रा. संजय आघाव, सिद्धेश्वर इंगोले, बालाजी कांबळे, केशव कुकडे, प्रा.डॉ.राजाभाऊ धायगुडे, प्रा.डॉ.अर्चना चव्हाण, बंडू आघाव, गणपत गणगोपालवाड, सुनील चव्हाण, सुनिता कोमावार, चेतना गौरशेटे, विजया दहिवाळ, किरण महाजन ,प्रा. सुलभा वाघमारे, भवानराव देशमुख , अरुण धर्माधिकारी , महेश होनमाने व सर्व पदाधिकारी मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या