Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांची उपमुख्याधिकारी पदी पदोन्नती

 आपला ई पेपर परळी


परळी नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष कार्यालयीन अधीक्षक संतोष धोंडीराम रोडे यांची उपमुख्याधिकारी पदी पदोन्नती झाली असून त्यांना आहे त्याच ठिकाणी कार्यरत राहण्याचे आदेश नुकतेच प्राप्त झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना त्यांच्या यशाबद्दल नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकतेच राज्यातील विविध नगरपरिषदेच्या एकूण ७३ अधिकाऱ्यांची नपप्रसं/संवर्ग पदोन्नती आदेश/कर व प्रशासकीय सेवा/कक्ष-३ब/२०२३/५५५५/१२-१०२०२३ महाराष्ट्र नगरपरिषद कर व प्रशासकीय सेवा (गट क) श्रेणी ब मधुन स्वरूपात पदोन्नतीने पदस्थापना करण्यात येऊन त्यांची उपमुख्याधिकारी पदी पदोन्नती होऊन नियमानुसार राज्यातील नगर परिषदेच्या 

 सदर आदेशात परळी नगरपरिषदेत निवडणूक विभाग, जनगणना विभाग, मालमत्ता व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या विभागात यशस्वीरित्या कार्यभार सांभाळून कार्यालयीन अधीक्षकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे संतोष रोडे यांची देखील उपमुख्याधिकारी पदी पदोन्नती झाली असून त्यांना आहे त्याच ठिकाणी कार्यरत राहण्याचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहे. 

संतोष रोडे यांच्या यशाबद्दल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जाबेरखां पठाण यांच्यासह विशाल पाठक, किरण तायडे, बाबा पारेकर, विकास जगतकर, सिद्धेश्वर घोंगडे, गौतम वाघमारे आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि फेटा बांधून सत्कार करीत त्यांच्या भावी कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या