Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

MIM | मुस्लिम समाजाला जो पर्यंत शैक्षणिक आरक्षण देत नाही तो पर्यंत उपोषण सुरू ठेवणार-शेख शरीफ भाई

 आपला ई पेपर 


परळी प्रतिनिधी मुस्लिम आरक्षण आमरण उपोषणाचा आजचा पहिला दिवस, मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण तसेच खासगीकरणाचा जि.आर. रद्द करा, या मागणी करिता  एम.आय.एमचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ भाई यांनी परळी येथील शाईन बाग तळ येथे  आज शुक्रवार पासून आमरण उपोषण सुरू केले असून मुस्लिम समाजाला जो पर्यंत शैक्षणिक आरक्षण देत नाही तो पर्यंत उपोषण सुरू ठेवणारच ठेवणार असल्याचे शेख शरीफ भाई यांनी सांगितले.

परळी येथील शाईन बाग तळ या ठिकाणी एम.आय.एमच्या वतिने आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून मुस्लिम आरक्षण समाजाला शैक्षणिक आरक्षण तसेच खासगीकरणाचा जि.आर. रद्द करा,  अदी मागण्या घेऊन एम.आय.एमचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ भाई हे आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला  वंचित बहुजन आघाडीचे भाई गौतम आगळे,जिल्ह उपाध्यक्ष बीड,गफ्फार खान, शहराध्यक्ष,यांनी आपले मनोगत व्यक्त करून पाठिंबा दर्शवला आहे.

 मुस्लिम समाजातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवून समाजाची दुर्दशा झालेली असून सुध्दा महाराष्ट्र सरकार आरक्षण देत नाही हीच शोकांतिकाच, कोर्टाने 5 टक्के शैक्षणिक आरक्षण देऊन अनेक वर्षे झाली असूनदेखील राज्य सरकार मुस्लिम समाजाचा अंत पाहत आहे.समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी व समाजसेवकांनी तसेच राजकीय नेत्यांनी आमरण उपोषणास भेट देऊन पाठींबा दिला. 

यावेळी परळी एम.आय.एम शहराध्यक्ष कादर कुरेशी,कोर कमिटी सदस्य शेख अश्फाक सेठ, नुर भाई कुरेशी, शेख जुबेर, शेख अन्वर भट्टी, सय्यद इश्त्याक भाई, नवाब पटेल साहेब, समद मुल्ला,सय्यद हुसेन, शेख नुर भाई, हमीद खान, आदम खान, सय्यद बबलू भाई,शहेबाज कुरेशी, अनेक जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या