Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

घटस्थापनेने योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

 आपला ई पेपर अंबाजोगाई 


महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास रविवारी सकाळीमहापूजेने प्रारंभ झाला योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा करण्यात आली.आज दि१५ आक्टोंबर ते २४ आक्टोंबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे.

सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला.अंबाजोगाईचे तहसीलदार तथा पदसिद्ध अध्यक्ष विलास तरंगे व पत्नी सौ.मयुरी तरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी मंदीराचे मुख्य पुजारी तथा विश्वस्त  यांच्यासह पुरोहित,मानकरी व भाविक उपस्थित होते. 

यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली.घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर भक्तांनी योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांना  दर्शनाची ओढ लागलेली असते दर्शन घेतल्यानंतर भाविकांमध्ये उत्साह दिसुन आला. योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन भाविक दर्शनासाठी येतात.शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त्याने योगेश्वरी मंदिर फुलांच्या माळांनी सजवले होते. 

भाविकांनीदर्शन घेतल्यानंतर अनेकांनी देवीचे छायाचित्र घेऊन ते सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित केले. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्त्याने विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या