Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत डेंगूमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू शहरात डेंगूचा कहर वाढला..

 आपला ई पेपर Parli 

कृष्णा नगर भागात राहणाऱ्या तेरा वर्षीय माऊली वैजनाथ फड या विद्यार्थ्यांचा डेंगू आजारामुळे मृत्यू झाला आहे. 

परळीतील संपूर्ण सावतामाळी नगर परिसरात घाणीमुळे मलेरीया व डेंगुचा आजार पसरला आहे.गेल्या चार दिवसापासुन डी.पी जळाल्यामुळे कृष्णानगर अंधारात आहे. 

 एम.एस ई.बी. अधिकारी कर्मचारी उडवाउडवीची ऊत्तर देत आहेत. यांच्या या हलगर्जीपणामुळे कृष्णा नगर भागातील एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाला आहे.

माऊलीच्या निधनास जबाबदार कोण ? 

परळी नगर परिषद प्रशासनाने त्वरीत परळी शहरात डेंग्यूची प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या