अंबाजोगाई /आपला ई पेपर /
महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दुपारी योगेश्वरी देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी निघाली.भाविकांनी ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.योगेश्वरी देवीच्या दसरा महोत्सवाची सांगता बुधवारी योगेश्वरी देवीच्या सीमोल्लंघन पालखीने झाली.
दुपारी विधिवत पूजेनंतर पालखी शहरात सीमोल्लंघनासाठी निघाली.पारंपरिक वाद्यांचा गजर,आराद्यांचा मेळा,ढोल पथक, झांज पथक यांच्यासह पालखी मंडीबाजार,रविवारपेठ,खडकपूरा,परळीवेस,मांडवारोड,अण्णाभाऊ साठे चौक,बसस्थानक,हौसिंग सोसायटी हा मार्ग असेल शहरात ठिकठिकाणी महिलांनी पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या,पालखीवर फुलांची उधळण करत स्वागत केले. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.



Social Plugin