Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत महेश सिनिअर सिटिझन ग्रूप तर्फे सहा ग्रूपसदस्य ज्येष्ठांचा सत्कार

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून महेश सिनिअर सिटिझन ग्रूप परळी ने आपल्या ग्रूप मधील जेष्ठ सदस्य ज्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली अशा ज्येष्ठांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान केला.

परळी शहरातील जेष्ठ नागरिकांची असलेली संस्था म्हणजे महेश सिनिअर सिटिझन ग्रूप होय. मागील पाच सहा वर्षापासून विविध सामाजिक कार्यात कार्यरत असलेला हा ग्रुप आपल्या ग्रुप मधील ज्येष्ठ सदस्यासाठी विविध उपक्रम राबवत असतो. शहरातील स्वच्छता मोहीम, गरजवंताना आपल्या क्षमतेनुसार सहकार्य करणे अथवा ज्येष्ठांच्या विरंगुळासाठी पर्यटन, वनभोजन, त्याचे जन्मदिवस साजरे करणे अशा विविध कार्यक्रमाचे  आयोजन व संयोजन या ग्रुप तर्फे करण्यात येते.

    भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे आणि ही संस्थाच जेष्टाचीच. या जेष्ठ  नागरिकांतून अति जेष्ठ असलेले सदस्य ज्यांनी आपल्या वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली,अशा ज्येष्ठांविषयी आदरभाव निर्माण करून त्यांचा सपत्नीक यशोचित सत्कारचा कार्यक्रम महेश सिनिअर सिटीजन ग्रुपने संकट मोचन हनुमान मंदिरात संपन्न केला. 

      या ग्रुपमधील सहा सदस्यांनी रामप्रसादजी झंवर (८०), मुरलीधरजी सारडा (७९), श्रीनिवासजी बंग(७९),   पंडितराव गीते (७७), विठ्ठलदासजी लड्डा (७६), हनुमानदासजी तोष्णीवाल (७६) आपल्या वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलीं असून त्यांनी आपल्या कार्यकाळात एक यशस्वी व्यक्ती म्हणून आपले नाव वलंयांकित केलेले आहे.  ते आज ज्येष्ठ असले तरी आपल्या अनुभवाची शिदोरी ही येणाऱ्या पिढीस देऊन त्यांना मार्गदर्शन करीत असते.  त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आजच्या तरुण पिढीस होत आहे. असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष व ग्रूप चे अध्यक्ष पांडुरंग सोनी यानी विदित केले.  कार्यक्रमाचे सूत्र संचलन करताना सह सचिव प्रा. बैजुलाल भंडारी यांनी या सहा व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती दिली.  विविध अडचणीवर मात करीत ते कसे यशस्वी झाले यावर त्यांनी प्रास्ताविकात प्रकाश टाकला. आभार प्रदर्शन करताना सचिव ओमप्रकाश भुतडा यांनी या सहा ज्येष्ठ सदस्यांचा आजच्या तरुण पिढीस कशाप्रकारे मार्गदर्शन मिळू शकते या बद्द्ल माहिती देऊन त्यांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त केला. 

या कार्यक्रमास हरिभाऊ सारडा, डॉक्टर आर.बी. जाजू ,मुरलीधर बंग, रामप्रसाद मोदानी, सुभाष तोतला, पांडुरंग मोदानी, भीमराव सातपुते, चैनसुख जाजू,  जुगल सारडा,  शिवनारायण मंत्री,  सुधीर बंग,  अरुण अर्धापुरे,  ओम प्रकाश तापडिया,  रामगोपाल कलंत्री,  शिवप्रसाद मुंदडा , किशोर चांडक,  विजय मुंदडा, दुर्गप्रसाद तापडिया, रमेश काकांनी, बाबुसेठ सारडा , रामनारायण भुतडा, हे सदस्य तसेच सत्कारमूर्ती चे परिवारातील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी कार्यकारिणी सदस्य सह ओमप्रकाश सारडा, बजरंग लाल चांडक, किशोर झरकर, व देविदास वाडे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या