Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी यापुढेही कार्यरत राहणार-अभयकुमार ठक्कर

 श्री ठक्कर यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सत्कारप्रभू वैद्यनाथास जलअभिषेक, 


विविध मंदिरात महाआरती; जिजामाता गार्डन येथे स्वच्छता अभियान राबविले


आपला ई पेपर/परळी वैजनाथ/प्रतिनिधी

परळी शहर आणि परिसरातील शिवसैनिकांपासून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानेच आपल्यावर मनापासून प्रेम केले असून या प्रेमाची शिदोरी घेत आपण कार्यरत आहोत. यापुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड उप जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष श्री अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी व्यक्त केला.दरम्यान आज सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी कार्यकर्त्यांनीश्री अभयकुमार ठक्कर यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रभु वैद्यनाथ जलअभिषेक, दक्षिण मुखी गणपती व श्री बजरंग बली नेता मंदिरात महाआरती करण्यात आली. जिजामाता गार्डन हेल्थ क्लबच्या वतीने आज सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कार्यकर्त्यांच्या वतीने  त्यांचा शाल ,श्रीफळ पुष्पहार व केक कापून सत्कार करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक या नावाने प्रसिद्ध असलेले अभयकुमार ठक्कर यांचा वाढदिवस आज सोमवारी परळी शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात  साजरा करण्यात आला. सकाळी श्री वैद्यनाथ मंदिर येथे श्रीं चे आशिर्वाद घेवून श्री ठक्कर यांच्या आजच्या वाढदिवसाची सुरूवात झाली. निवासस्थानी आई-वडिलांचे प्रतिमेचेही त्यांनी आशिर्वाद घेतले. कार्यकर्त्यांच्या वतीने विविध ठिकाणच्या मंदिरात श्रीं ची महाआरती  करण्यात आली. आज दिवसभर विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त अभयकुमार ठक्कर यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी बोलतांना श्री अभयकुमार ठक्कर यांनी सांगितले की, परळी शहर आणि परिसरातील नागरिकांचे आपल्यावर मनापासून प्रेम असून मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांसाठी जे शक्य आहे ते काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले आशिर्वाद आणि सहकार्य माझ्या पुढील आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे असून यापुढेही आपल्या सेवेत अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास श्री अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी विविध ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमास युवासेना बीड जिल्हा समन्वयक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अतुल दुबे,शिवसेना माजी उप शहर प्रमुख सतीश जगताप, शिवसेना माजी शहर संघटक  संजय कुकडे, युवासेना विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना छ.शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, अमित कचरे, सचिन लोढा, शिवसेना उपशहर प्रमुख किशन बुंदिले, मनीष जोशी, कारभारी शिंदे, प्रकाश देवकर, सायस फड, योगेश घेवारे,  बाबासाहेब शिंदे, लक्ष्मण मुंडे,योगेश जाधव, नवनाथ वरवटकर, ईश्वर इंगळे यांच्यासह शिवसेना, युवा सेना, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या