Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीडमध्ये किरकोळ वादानंतर थेट गोळीबार ; एकजण गंभीर जखमी..

 


आपला ई पेपर 

बीड जिल्ह्यामध्ये कायदा हातात घेणाऱ्याला कठोर शिक्षा झाल्याशिवाय अशा घटनांचा बंदोबस्त होणे अशक्य आहे. साध्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर एकाने थेट गोळीबार केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीत गोळी घुसली आहे. गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.


 प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले आहे. ही घटना बीड शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पात्रुड गल्ली माळी वेस येथे रात्री बाराच्या दरम्यान घडली. घटना घडल्यानंतर आरोपीने पोबारा केला. पोलिसांचे दोन पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत.मनोज दत्ताराव जाधव (वय 35 वर्ष, रा. पाथरूड गल्ली, माळी वेस बीड) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 त्याच्या मामाचा मुलगा आणि जखमी जाधव यांच्यात दि. 1ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान किरकोळ वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. जखमी जाधवच्या दिशेने त्याच्या मामाच्या मुलाने थेट गोळी झाडली ही गोळी जाधव याच्या छातीत घुसली. पोलिसांच्या माहितीनुसार एक फायर करण्यात आला आहे. 

जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतात आरोपीने तेथून पोबारा केला. जखमीला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

 घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके, बीड शहर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख कुलकर्णी यांच्यासह बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या शोधासाठी रात्रीच पोलिसांची दोन पथक पाठवण्यात आले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या